Saturday, September 26, 2015

गणपती बाप्पा मोरया....पुढच्या वर्षी लवकर या!

आज बाप्पा परतीच्या प्रवासाला निघणार. अगदी थोर ते बाल वयोगटातील मित्र मंडळी खिन्न मनाने त्याच्या सांगतेची तयारी करतात. आहेच असा तुमचा, आमचा आणि आपल्या सगळ्यांचा 'बाप्पा'! अंगाने अवजड पण चेहऱ्यावरचे भाव बालीश आणि लोभस.

मोरया रे बाप्पा मोरया रे...

कशी एक मूर्ती, आपल्या घराची शोभा द्विगुणित करतो हे कोडे आजतागायत उलगडले नाही. गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे 'लाईव्ह' नेटवर्किंग काय असते हे पटवून देते आणि त्याची सुरुवात म्हणजे गल्लीतले किंवा चाळीतले किंवा सोसायटीतले तरुण मंडळी वर्गणी जमवतात, दारोदारी जाऊन. गणेश स्थापना, सकाळ - संध्याकाळ ची आरती, सगळ्या वयोगटातील मंडळीसाठी स्पर्धा, काही ठिकाणी 'फन फेर', ह्या दहा दिवसांत कधीही न दिसलेले चेहरे चक्क हसताना आणि कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात. अचानक गल्लीतले किंवा चाळीतले किंवा सोसायटीतले काही फारसे 'गुड फोर नथिंग' तरुण मंडळी अत्यंत धडाडीचे नेतृत्व करताना दिसतात, कुठली मॕनेजमेंट स्कूल असा क्रॕश कोर्स देईल? माझा आवडीचा भाग म्हणजे संध्याकाळची आरती! काय तो कमालीचा तल्लीन पणा, दिवसभराचा क्षीण त्या 'टाळ्या-घंटी-करपूर' ह्या त्रिकुटात विलीन होत. उकडीचे मोदक कोण विसरेल बरं?

इतका आनंद, उदंड उत्साह आणि मनाला प्रसन्नता देणाऱ्या बाप्पा ला कोणाला सोडावा वाटेल? तो जाताना चैतन्य घेऊन जाईल!

मला काही राहावेना, मी बाप्पाला म्हणाले, 'प्लीज जाऊ नकोस रे, पुन्हा आमचं आयुष्य रटाळ होऊन बसेल, हे असं लाईव्हली वातावरण राहणार नाही. तु पुन्हा एक वर्षानंतर येणार तोपर्यंत आम्ही हा सगळा आनंद, उत्साह  विसरून जाऊ. नको ना जाऊ रे'.

बाप्पा एक मोदक खात म्हणाला, 'ह्ममम्, फारच टेस्टी आहे. अगं मी परत येणार आहे पुढच्या वर्षी. मी जाताना तुम्हा सगळ्यांचे प्रेम घेऊन जातो आणि जेव्हा त्याचा साठा संपतो मी परत येतो, तसंही तुम्हा माणसांना आवडीची गोष्ट लिमिटेड मिळालेलीच बरी असते!'

बाप्पाचं हे म्हणणे मला पटले, ह्या दहा दिवसांचा आनंद आणि उत्साह आपल्याला वर्षेभर पुरेल आणि प्रेरणा देत राहिल.

मी बाप्पाला नमस्कार करुन निघत होतेच तेवढयात बाप्पा म्हणाला, 'अगं, पुढच्या वर्षी तुमच्या मंडळाला सुचव की मला 'ईको फ्रेन्डली' स्वरूपात आणण्याचे आणि हो नो डाॕल्बी प्लीज!'

मी बाप्पाला हाय-फाईव्ह दिला आणि सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देत म्हणाले, 'गणपती बाप्पा मोरया....पुढच्या वर्षी लवकर या!'

10 comments:

  1. सुंदर लेख आहे.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. धन्यवाद. मला खूपच आनंद झाला तुझा कमेन्ट वाचून.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. माणसांना आवडीची गोष्ट लिमिटेड मिळालेली बरी...हे सर्वात उत्तम...अप्पलपोटि हावरट माणूस...देव सुद्धा खरंच वैतागला असेल.
    लेखाने फक्त माणसाच्याच नव्हे तर देवाच्या मनातील भावना सुद्धा चपखल व्यक्त केल्या आहेत...छान!

    ReplyDelete
  7. माणसांना आवडीची गोष्ट लिमिटेड मिळालेली बरी...हे सर्वात उत्तम...अप्पलपोटि हावरट माणूस...देव सुद्धा खरंच वैतागला असेल.
    लेखाने फक्त माणसाच्याच नव्हे तर देवाच्या मनातील भावना सुद्धा चपखल व्यक्त केल्या आहेत...छान!

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हा मी लिहायला सुरूवात केली तेव्हा एक मनोगत मांडायचा प्रयत्न करात होते पण लिहिताना त्याला वेगळा स्वरूप आला आणि खरंच देव सुद्धा मनुष्य कृत्य बाजारीकरणाला वैतागला असेल...आशा आहे की कधी तरी आपल्याला अक्कल येईल !

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. This comment has been removed by the author.

      Delete